भाषा आणि साहित्य : माझी भूमिका (मराठी), (साहित्यविषयक)

सयाजीराव महाराज हे प्रज्ञावंत राजा होते. त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांतून आणि पत्रांतून भाषा आणि साहित्य या विषयावर अभ्यासपूर्ण वैचारिक भाष्य केले. या भाषणांचे आणि पत्रांचे संपादन या ग्रंथात केले आहे.

चित्र-चरित्र – महाराजा सयाजीराव गायकवाड (मराठी)

सयाजीराव महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ ८९ कोटी रुपयांची मदत हिंदुस्थान आणि जगातील लोकांना केली. त्या व्यक्ती आणि संस्था यांची समग्र चित्ररूप ओळख या ग्रंथात आहे.

अस्पृश्य जाती – महाराजा सयाजीराव गायकवाड (मराठी) (दुर्मिळ लेख)

सयाजीराव महाराजांनी इ.स. १९०९ साली ‘अस्पृश्य जाती’ हा लेख लिहिला होता. या दुर्मिळ आणि ऐतिहासिक लेखाचे संपादन या ग्रंथात केले आहे.

समाजशिल्पशास्त्रज्ञ सयाजीरावांची ओळख (मराठी) (लेखसंग्रह)

सयाजीराव महाराज हे सुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील सुधारणांवर नव्याने लिहिलेल्या वीस लेखांचा समावेश या ग्रंथात आहे.

महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम (मराठी) (इतिहास)

सयाजीराव महाराजांचे पुणे शहरावर असलेले प्रेम आणि पुण्यातील सर्व सुधारणांना केलेली मदत याविषयीचा महत्त्वाचा इतिहास या ग्रंथात आहे.